कोंकण विभागात  एकूण ६४.१४ टक्के मतदान

 

 १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

मत मोजणी सोमवार दि. 1 जुलै 2024 रोजी

नवी मुंबई  :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४ रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी  ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण 1 लाख 20 हजार ७७१ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण ७६ हजार ६४६ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ पदवीधर/शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ पदवीधर/शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दिनांक  26 जून  जानेवारी 2024 मतदान वेळ :- सकाळी  07.00 ते सायंकाळी 06.00 पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ  ६४.१४%

ठाणे- ५८.४२%, पालघर- ६३.२३%, रायगड- ६७.५९%, रत्नागिरी-६९.१४%, सिंधुदूर्ग-७९.८४% एकूण- ६४.१४%

मुंबई पदवीधर मतदारसंघ ५६.०१%

मुंबइ शहर- ५७.६८%   मुंबई उपनगर-५५.४४%       एकूण-५६.०१%

मुंबई शिक्षक मतदारसंघ ७५.७७%

मुंबइ शहर- ८०.१२%  मुंबई उपनगर-७४.९५%       एकूण-७५.७७%

मत मोजणी सोमवार दि. 1 जुलै 2024 रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-24, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे.