*जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा*

 

मंडणगड/प्रतिनिधी :मंडणगड पोलीस स्टेशनच्या वतीने हा दिन साजरा करण्यात आला.

मंडणगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयमध्ये दि.26 जून 2024 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.विजय खाडे यांनी मंडणगड पोलीस निरीक्षक श्री. नितीन गवारे आणि पोलीस नाईक श्री मांडवकर ,श्री कोळथरकर,श्री कुंभार आणि चव्हाण मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.गवारे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी हे देशाचे आधारस्तंभ आहेत.तरुण पिढीने अंमली पदार्थ विरोधी जागृती समजावून घेतली पाहिजे.

उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर यांनी अंमली पदार्थाचे घातक दुष्परिणाम सांगितले.

या प्रसंगी सौ.आटपाडकर मॅडम,श्री गोरड सर,श्री याचावाड सर हजर होते.

आभारप्रदर्शन श्री केंद्रे सर यांनी केले.