वाटूळ | वार्ताहर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील तिवंदामाळ थांब्यानजीक एक चारचाकी रस्त्याच्या कडेला मोरीमध्ये पडल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही.
शुकवारी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने टाटा नेक्साŸन या चारचाकी वाहनाने पवास करणाऱया सागर नायर यांचा तिवंदामाळ येथे आल्यानंतर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी लगतच्या मोरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले असले तरी नायर यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.












