खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गा वरील बोरघर नजीक डंपरचे स्टेअरिग जाम झाल्याने डंपर विद्युत पोलला धडकून झालेल्या अपघातात चालका सह अन्य दोन जखमी झाले हा अपघात सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
तुकाराम ज्ञानेश्वर साळे, संगिता विजय चव्हाण, बिल्लू भिमराव राठोड सर्व रा असोंड, ता- दापोली जिल्हा रत्नागिरी. असे त्या जखमी झालेल्या ची नावे आहेत या प्रकरणी तुकाराम ज्ञानेश्वर साळे (वय ५५ वर्षे व्यवसाय मजुरी, रा असोंड, ता- दापोली मुळ रा- मदरुप ता.जि. सोलापुर) यांनी फिर्याद दाखल केली त्या नुसार चालक बिल्लू भिमराव राठोड, (वय ५५ रा. असोंड, ता. दापोली जि. रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक राठोड हा आपल्या ताब्यातील डंपर असोंड, ते तुळशी, ता- खेड असा चालवित घेवुन जात असताना बोरघर नजिक डंपरचे स्टेरिंग जाम झाल्याने राठोड याचा डंपर वरिल ताबा सुटल्याने व त्याचे ताब्यातील डंपर भरगाव वेगाने रस्त्याच्याकडेला असल्याल्या एम एस सी बी इलेक्ट्रिक लोखंडी पोलला धडक देवून अपघात झाला












