वाभवे – वैभववाडी शहराच्या विकासासाठी १३ कोटी ६२ लाख निधी प्राप्त

 

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मिळाला इतका भरघोस निधी

या निधीतून शहरातील २५ विकास कामे गेली पुर्णत्वास

आचारसंहितेमुळे थांबलेली कामेही लवकरच मार्गी लागणार

भाजपा शहर प्रवक्ते डॉ राजेंद्र पाताडे यांची पत्रकार परिषदेतून माहिती

वैभववाडी | प्रतिनिधी : वाभवे – वैभववाडी शहराच्या विकासासाठी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून १४ कोटी ६२ लाख इतका निधी विकास कामांसाठी प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील जवळपास २५ प्रमुख विकास कामे पूर्णत्वाला गेली आहेत. अशी माहिती वैभववाडी भाजपा शहर प्रवक्ते डॉ. राजेंद्र पाताडे यांनी दिली. आचारसंहितेमुळे मंजूर असलेली परंतु रखडलेली उर्वरित कामे लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन ही डॉ. पाताडे यांनी दिले आहे.

 

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत हद्दीत झालेल्या विविध विकास कामांच्या आढावा संबंधी वैभववाडी शहर भाजपाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक प्रदीप रावराणे, सुभाष रावराणे, नगरसेविका संगीता चव्हाण, यामिनी वळवी, सौ. सुप्रिया तांबे, राजन तांबे आदी उपस्थित होते.
शहरात पूर्णत्वास गेलेल्या २५ कामांबाबत माहिती प्रवक्ते डॉ. राजेंद्र पाताडे यांनी दिली. या कामांमध्ये शहरातील बंदिस्त गटारे, रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे, मोरी बांधकाम करणे, कॉलेज रोड बांधकाम करणे, रस्ता डांबरीकरण करणे, रस्ता दुतर्फा साफसफाई करणे, रेडीमेड शौचालय सुविधा उपलब्ध करणे, स्ट्रीट लाईट बसविणे, फूटपाथ बांधणे, गणपती विसर्जन घाट सुशोभीकरण करणे, काँक्रीट रस्ता तयार करणे, स्मशानभूमी विकसित करणे, रस्ता रुंदीकरण करणे, नदीवर बंधारा बांधणे, सीसीटीव्ही बसविणे, बेस रीड सिस्टीम तयार करणे, इनडोअर टर्फ ग्राउंड बनविणे, ड्रेनेज व सांड सांडपाण्याचे नियोजन करणे. आदी कामांचा समावेश आहे.

 

चालू वर्षी शहरात बंदिस्त गटार बांधकाम करण्यात आले आहे. उर्वरित बंदिस्त गटर हे आचारसंहितेमुळे रखडले आहे. काही दिवसातच ते गटर पूर्णत्वास जाईल तसेच संभाजी चौक सुशोभीकरणासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. ते देखील काम काही दिवसातच मार्गी लागेल असे डॉ. पाताडे यांनी सांगितले.