भाजपा च्या संगमेश्वर तालुका महिला मोर्चा उपाध्यक्षपदी सौ शीतल दिंडे

Mrs. Sheetal Dinde as vice president of BJP’s Sangameshwar Taluka Mahila Morcha

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावच्या सौ शीतल सचिन दिंडे यांची भारतीय जनता पार्टी च्या संगमेश्वर महिला मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. .हि निवड भाजपा तालुकाध्यक्ष श्री.प्रमोदजी अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. कोमलताई रहाटे यांनी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.यावेळी संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव,महिला जिल्हा अध्यक्ष ऐशर्या जठार,नगराध्यक्ष. सौ मृणाल शेट्ये,अभिजित शेट्ये,सुशांत मुळ्ये युवक अध्यक्ष राजेंद्र गवंडी, सुधीर यशवंतराव शक्ती केंद्र प्रमुख दिलीप नाटे अमोल गायकर.यशवंत गोपाळ आदी उपस्थित होते.सौ शीतल यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे