रत्नागिरी | प्रतिनिधी : कोकण विभागातील तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील तहसीलदार वैषकी पाटील यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या पदावर अर्चना बोंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवर्धन, रायगडचे तहसीलदार सचिन गोसावी यांची रत्नागिरी जिल्ह्यातील अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण या रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
पोलदपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई यांची वैभववाडी तहसीलदार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर भूमिका संपादन पुनर्वसन प्राधिकर्ण कार्यालय नागपूर येथील वर्षा झाल्टे यांची मालवणी तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.