देवगड जामसांडे नगरपंचायत इमारती जवळचे कचरा डम्पिंग ग्राउंड हलवले

आमदार नितेश राणे यांनी घेतली होती दखल

माजी नगराध्यक्ष चांदोसकर यांनी दिली होती मोफत जागा

ओमटेक असोसिएटने केली होती वाहतूक व्यवस्था

देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या इमारती शेजारीच प्रशासनाने कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड केले होते या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे देवगड शहरवासीयांना राहणे मुश्किल झाले होते माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर व ओमटेक असोसिएट या दोघांनी या कचऱ्याची विल्हेवाट लावली असून आता ही जागा साफ झाली आहे

माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार या कचऱ्याबाबत निर्णय घेत असल्याची पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार कचरा टाकण्यासाठी योगेश चांदोस्कर यांनी मोफत जागा दिली व त्या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी ओमटेक असोसिएटचे सुशील लोके, समीर पेडणेकर हेमंत देसाई यांनी पुढाकार घेतला व हा कचरा आता साफ करून त्या ठिकाणी माती टाकली आहे. भाजपा देवगड जामसांडे नगरपंचायत मध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करते तरीही लोकांसाठी हा कचरा उचलून टाकण्याचे काम आपल्या यंत्रणेमार्फत आमदार नितेश राणे यांनी केले याबद्दल जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत