‘कोकण पदवीधर’ च्या मतमोजणीचे updates : कुठपर्यंत पूर्ण झाली मतमोजणी पहा

 

नवी मुंबई : विधान परिषद कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदार संघाची मतमोजणी अपडेट
तीनही मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण.
कोकण पदवीधर मतदारसंघ
• 321 केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण.
• एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या.
• आता प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु. एकूण 4 फेऱ्या होतील.
• त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल.

मुंबई पदवीधर
• एकूण 67 हजार 644 मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली.
• मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु.
• त्यानंतर कोटा ठरेल.

मुंबई शिक्षक मतदारसंघ
• एकूण 12 हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे.
• यातील 402 मतपत्रिका अवैध आढळल्या.
• 5800 हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे.
• प्रत्यक्ष मतमोजणी सुरु सुरुवातीस पहिल्या पसंतीची मते त्या त्या उमेदवारांना वाटप करण्याचे काम सुरु होईल.