वैभववाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 मध्ये श्री. अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी. फार्मसी इन्स्टिट्यूट, सांगुळवाडी या कॉलेजची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री वळंजू हीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कॉलेजचा प्रथम वर्षाचा निकाल ९४.४४ टक्के लागला असून द्वितीय वर्षाचा निकाल ९६.९२ टक्के लागला आहे.
प्रथम वर्षामध्ये प्रथम क्रमांक – कु. तृप्ती काळे 78.00 टक्के, द्वितीय क्रमांक- कु. आदिती लाड 77.50 टक्के, व तृतीय क्रमांक कु. स्विटी राठोड हिने 76.90 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. तसेच द्वितीय वर्षामध्ये प्रथम क्रमांक – कु. भाग्यश्री वळंजू 86.36 टक्के, द्वितीय क्रमांक- कु. साक्षी साळसकर 85.18 टक्के, व तृतीय क्रमांक – कु. अमिषा चव्हाण हिने 84.36 टक्के गुण मिळवत यश प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक श्री. संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. येवले, प्राचार्य श्री. जीवन पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.










