महापुरुषांच्या नावाचा वापर करीत गाडीतून होणारी गुरांची वाहतूक रोखा

Google search engine
Google search engine

Stop the movement of cattle by using the name of Mahapurusha

छावा संघटनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी :थोर महापुरुषांच्या नावाचा वापर असलेल्या गाडीतून गुरांची होणारी वाहतूक रोखा, अशा आशयाचे निवेदन छावा संघटनेच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठया प्रमाणात गाई व गुरे याची वाहतूक होत आहे. कणकवली या ठिकाणी एका आयशर गाडीतून गाईची कोंबून वाहतूक होत होती थोर पुरुषांची नावे वापरून अशी वाहतूक चूकीची आहे, त्यामुळे असे प्रकार रोखावे अशी मागणी सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.सध्या मोठ्या प्रमाणात गो हत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशाच प्रकारे कणकवली या ठिकाणी एका गाडीतून गाईची वाहतूक करताना ती गाडी पकडली गेली. संबंधित गाडीवर छत्रपती व छावा असे नाव टाकण्यात आले होते. अशा प्रकारे ऐतिहासिक थोर पुरुषांची नावे टाकून अशी वाहतूक करणे चुकीची आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष रामचंद्र कुडाळकर, सिंधुदूर्ग जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, माडखोल अध्यक्ष संदीप चांदरकर, ज्ञानेश्वर पारधी, उमेश तळवणेकर व संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.