बाजारपेठ श्री साईबाबा मंदिराचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बाजारपेठ येथील श्री साईबाबा मंदिरात १३ वा वर्धापन दिन साई भक्तांच्या अलोट उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवानिमित्त श्री साईभक्त मंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.यात साईंची पूजा, अभिषेक व आरती, महाप्रसाद तर रात्री मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘कृष्णपूजन’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

श्री साई वात्सल्य, मेनरोड बाजारपेठ सावंतवाडी येथील या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. यामध्ये मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे मालक संतोष मोरे, फुलांचे व्यापारी साईभक्त चंद्रशेखर परब, ज्येष्ठ नाट्यरसिक शंकर बिद्रे, पुरस्कार प्राप्त पत्रकार विनायक गांवस यांचा शाल व श्रीफळ देऊन साईभक्त मंडळ, भवानी चौक मार्फत सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कार मुर्तींनी मंडळाचे आभार मानत हा साईबाबांचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी साईभक्त मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख, ज्ञानदीपचे संस्थापक वाय.पी. नाईक, खजिनदार सुनील नेवगी, दानिश शेख,बाळू कांडरकर, रत्नेश माळी आदींसह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.