गटनेते शरद ठूकरुल यांची माहिती
देवगड येथील आमदार संपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र मार्गदर्शनासाठी कक्ष उघडण्यात आल्याची माहिती देवगड जामसांडे नगरपंचायतीतील गटनेते शरद ठूकरुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आमदार नितेश राणे यांनी ही कागदपत्रे पूर्ण करून घेणे व मार्गदर्शन करणे यासाठी दोन स्वतंत्र व्यक्ती देवगड येथील आमदार संपर्क कार्यालयात नेमले आहेत
सकाळी 10 ते दुपारी दीड या कालावधीत ज्यांना या योजनेबद्दल माहिती हवी आहे अथवा कागदपत्रे पूर्ण करायची आहेत याबाबत कोणत्याही अडचणी येत असतील तर तातडीने दिलेल्या वेळेमध्ये या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी शहर भाजपाने केले आहे
या योजनेचा फायदा नियमात बसणाऱ्या प्रत्येक महिलेने घ्यावा असे आवाहनही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळस्कर माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, नगरसेविका तनवी चांदोसकर माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी तन्वी शिंदे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील विभागीय अध्यक्ष योगेश पाटकर वैभव कळंगुटकर उपस्थित होते












