स्थानिक ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन
कतांबिस्त । प्रतिनिधी :
कलंबिस्त गावात होऊ घातलेल्या स्टोन क्रशर दगड उत्खनन प्रकल्पाला शासन स्तरावर ना हरकत दाखला देऊ नये अशा मागणीचे निवेदन
गावातील देवस्थान गावकर व देवकर मंडळी तसेच सर्व ग्रामस्थांच्यावतीने शिष्टमंडळाने सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे सादर केले. शेती बागायतीला हानिकारक असलेला दगड उत्खनन स्टोन क्रशर झाल्यास शेतीसह या भागातील निसर्ग व पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. तसेच वस्तीतील लोकांनाही या प्रकल्पामुळे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असून शासन स्तरावर या दगड खाण प्रकल्पाला आपण कोणतीच परवानगी देऊ नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ धोंडी सावंत, रमेश सावंत, अनिल सावंत, तिमाजी सावंत, गजानन सावंत, बाबा पास्ते, पांडुरंग राऊळ, सुनील सावंत, अनिल सावंत, सोमा सावंत, कांता सावंत, सुभाष सावंत, कृष्णा देसाई, सुरेश पास्ते, अनिल सावंत, हरिश्चंद्र तावडे, दशरथ पास्ते, विष्णू कदम, नरेश बिडये, मेघ :शाम सावंत, सुरेश सावंत, शांताराम भिडे , हरिश्चंद्र तावडे लाडू सावंत विठ्ठल सावंत भिकाजी सावंत, रमाकांत नाईक, बुधाजी घाडी , हनुमंत पास्ते, अरुण सावंत, रमेश सावंत, वसंत सावंत , सिद्धेश सावंत, अक्षय सावंत, अभिषेक सावंत, आनंद मेस्त्री , कृष्णा सावंत, प्रकाश सावंत, सूर्यकांत राजगे, प्रकाश सावंत, प्रवीण सावंत, बाबली मेस्त्री , दीपक मेस्त्री , प्रवीण मेस्त्री , मंदार जंगम यांसह शेकडो ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे गावातील गट क्रमांक १२८८ ही जमीन खरेदी करण्यात आली असून सदर जमिनीत दगडखाण स्टोन क्रशर व त्यावर आधारित उद्योगांना ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला मिळण्याबाबत ५ सप्टेंबरला अर्ज दाखल केला आहे. ग्रामसभेत या दगडखाण उद्योगाला ना हरकत देऊ नये व यापुढे दाखला मागणीचा अर्जही स्वीकारू नये असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला. मूळात अशा हानिकारक प्रकल्पाला आमचा पूर्ण विरोध आहे. हा गाव निसर्गरम्य असून येथे शेती बागायतीवर आधारित उपजीविका आहे.
आंबोली सह्याद्री पट्टा व पर्वतरांगा असा हा भाग आहे या भागातील दगड व निसर्ग संपत्ती गावाच्या विकासाला आणि पर्यावरणाला पोषक आहे. त्यामूळे या भागातील डोंगर व दगड यांचे उत्खनन केल्यास मोठ्या प्रमाणात गावाच्या वस्तीला हानी पोहोचणार आहे आणि येथील शेती बागायती तसेच पूरक व्यवसाय पशुसंवर्धन जनावरे गुरेढोरे तसेच पिण्याच्या पाण्यावर मोठा परिणाम होणार आहे. नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत यामुळे नष्ट होणार आहेत.
या नियोजित खाणीलगत मोठ्या प्रमाणात १०० ते २०० घरांची वस्ती आहे. तसेच देवालय, मंदिरे, शाळा ही या लगत आहेत. हा गाव देश सेवा करणाऱ्या सैनिकांचा गाव आहे त्यामुळे अशा या महत्त्वपूर्ण आणि पर्यावरणाला पूरक असलेल्या निसर्ग संपत्ती लाभलेल्या या गावाचे आरोग्य व पर्यावरण बिघडेल असा हानिकारक स्टोन क्रेशर प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असून त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
फोटो – कलंबिस्त गावात स्टोन क्रशरला परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन तहसिलदार श्रीधर पाटील यांना सादर करताना जेष्ठ ग्रामस्थ धोंडी सावंत सोबत अनिल सावंत बाबा पास्ते नरेंद्र बिड ये पांडुरंग राऊळ आदी
( रविंद्र तावडे )
Sindhudurg