राजापूरात शिवसेनेच्या वतीने ७ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने रविवार ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता राजापूर हायस्कुल कलामंदिर सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावेळी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत तसेच विविध स्पर्धात्मक परिक्षांत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत उपस्थीत राहणार आहेत.
यावेळी सर्वांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू व तालुकाप्रमुख दिपक नागले यानी केले आहे.