–जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ जगताप
रत्नागिरी,: १ जुलैपासून, जुलै २०२३ च्या शासन निर्णयनुसार एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नवीन अंमलबजावणीनुसार चालू करण्यात आली
असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ भास्कर जगताप यांनी कळविले आहे.
या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्ड धारक व आयुष्यमान भारत कार्ड धारक. रेशनकार्ड
नसलेली – अधिवासी धारक वा तहसीलदार प्रमाणपत्र, शासनमान्य संस्थेतील अनाथ मुले, वृध्दाश्रमातील ज्येष्ठ
नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी
असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लगत ८६५ गावातील कुटुंब, रस्ता अपघातग्रस्त
महाराष्ट्राबाहेरील वा देशाबाहेरील असणार आहेत.
लागणारी कागदपत्रे :
महाराष्ट्रातील कोणतेही रेशनकार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ई..),
रेशन कार्ड नसल्यास तहसीलदार चे प्रमाणपत्र, रस्ता अपघातग्रस्तसाठी ज्या जिल्ह्यामध्ये लाभ घेणार आहे त्या
जिल्ह्यातील एम.एल.सी. ओळखपत्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील – रेशनकार्ड, ओळखपत्र, आयुष्यमान कार्ड.
या योजनेंतर्गत एकूण १३५६ आजारांवर मोफत उपचार त्यापैकी ११९ शासकीय रुग्णालयास राखीव. रस्ता
अपघातग्रस्त रुग्णास प्रति वर्षी १ लाख पर्यंत मोफत उपचार. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर ४.५ लाखापर्यंत उपचार.
नवीन अंमलबजावणीबाबत दिनांक ३० जून रोजी सर्व अंगीकृत रुग्णालयास राज्य व जिल्हा स्तरावरुन सूचना देण्यात
आली आहे.











