विधानभवनातून
संतोष वायंगणकर
मुंबईत गुरुवारी पाऊस कोसळणार म्हणून हवामान विभागाने जाहीर केले होते. पंरतु गेले दोन तीन दिवस मुंबईत पावसाने दडी मारली आहे. उष्णतेने घामाच्या धारामध्येच मुंबईकर आपल्या दिनक्रमात व्यस्त आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवशी विधानसभागृहात महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विषयक चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरातील आरोग्य विषयक चर्चेत पुणे येथील ससून रुग्णालयावर पुण्यातील आमदारांनी प्रश्न उपस्थित करत ससूनची सध्याची गंभीर स्थिती निदर्शनास आणली. याचवेळी राज्यातील शहर व ग्रामीण भागातील आरोग्यसेवेची स्थिती अनेक रुग्णालयात सारखीच आहे. त्या सर्व स्थितीत सुधारणा करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात यावी आणि महाराष्ट्राचा आरोग्य विभागातील त्रुटी दूर करण्यासाठी नुसते प्रयत्न नकोत तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. सभागृहात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब थोरात आदींनी हा विषय लावून धरला तेव्हा सभागृहात उपस्थित मंत्री उदय सामंत आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात सरकार गभिंरपणे घेत असल्याचे सांगितले. जलजीवनच्या कामांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. जलजीवनच्या कामातील त्रुटीचा आणि जलजीवनच्या कामांचा कसा बोजवारा वाजला आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी जलजीवनच्या कामांचा पाढाच वाचला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात अनेक सर्व सामान्याशी निगडीत प्रश्नांची चर्चा झाली. सोमवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहातील असंसंदीय शब्द वापरले म्हणून पाच दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र बुधवारी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांच्या दालनात एक बैठक झाली या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच निलंबना संबंधित चर्चा झाली. गुरूवारी उपसभापती निलम गोरे यांनी सभागृहात अंबादास दानवे यांचे निलंबन कमी करुन पाच ऐवजी तीन दिवस करण्यात आले. विधान भवनाच्या आवारात तृणधान्य चे पौष्टीक पदार्थ आमदार, मंत्री यांना जेवणात देण्यात आले. नाचणी, बाजरीची भाकरी, शेंगदाणाचटणी, मेतकूट, तिळकूट, अंबाड्याची भाजी, भरल वांगी, जवसची खीर असा सगळा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात रोजच्या जेवणात असलेले मेनू होते. बांबू विकास महामंडळाचे माजी आमदार पाशा पटेल यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री धनंजय मुंडे , विधीमंडळातील आमदारांनी या चटणी भाकरी, भाजीचा आस्वाद घेतला. सकाळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायर् यावर घोषणाबाजी केली. ११ विधानपरिषद सदस्यांची निवडणूक आहे. ११ जागांसाठी १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीची चर्चा हि होत आहे
निवडणूक झाली तर घोडेबाजार आणि फोडफोडीच राजकारण कस असेल याविषयीची खुमासदार चर्चा होत होती.












