राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनची

शनिवार ६ जुलै रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन संलग्न राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार ६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता छायाचित्रकार प्रदिप कोळेकर यांचे समर्थनगर येथील छायारंग या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे.

 

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभेला राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन मधील सर्व कार्यकारिणी,सर्व सभासद,या संघटनेत नव्याने येणार असणारे सर्व प्रोफेशनल फोटोग्राफर व्हिडीओग्राफर यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित रहावे असे आवाहन राजापूर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश खांबल यांनी केले आहे.