लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ सोमवार ८ जुलै पासून शैक्षणिक साहित्य वाटप दौऱ्यावर

४५ शाळांना भेट देवून करणार शैक्षणिक साहित्य वाटप

राजापूर (वार्ताहर): दरवर्षी शिक्षण पंढरीची वारी करणारे लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ सोमवार ८ जुलै पासून शैक्षणिक साहित्य वाटप दौऱ्यावर येत आहे. यंदाचे हे ३४ वे वर्ष आहे. यावेळी ते लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील शाळांना भेटी देवून शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहेत.

 

सोमवार ८ जुलै रोजी पासून संगमेश्वर तालुक्यातून या दौऱ्याला प्रारंभ होत आहे. सकाळी १० वाजता जि. प. शाळा गोठणे पुनर्वसन हातीव, ११ वाजता जि. प. शाळा हरपुडे नं. १, दुपारी १२ वा. जि. प. केंद्रशाळा सायले, २ वा. जि. प. शाळा राजवाडी ब्राम्हणवाडी, ३ वा. पै. ह. दा. मु. माध्य. विद्यालय कुरधुंडा, साय. ४ वाजता जि. प. शाळा मानसकोंड, त्यानंतर देवरूख येथे आगमन व मुक्काम.

 

मंगळवार ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वांझोळे हायस्कुल, १० वा. केंद्रशाळा कनकाडी गोताडवाडी व खालची गुरववाडी शाळा, ११ वा. जि. प. शाळा मोर्डे नं. १, दुपारी १२ वा. शाळा देवडे नं. २, दुपारी २ वाजता तु. ग. गांधी विद्यालय कोंडगाव व जि. प. शाळा दखिण धनगरवाडी, सायं. ४ वाजता माध्यमिक विद्यालय दाभोळे त्यानंतर लांजा येथे आगमन व मुक्काम.
बुधवार १० जुलै रोजी सकाळी ९ वाजता जि. प. शाळा बेनीखुर्द, १० वाजता
न्यू इंग्लिश कोचरी, ११ वा. जि. प. शाळा पालू नं. १, दुपारी १२ वा. कोर्ले नं.३,दुपारी २.३० वाजता केंद्रशाळा वेरवली नं. १, व छ. शिवाजी महाराज विद्यालय, दुपारी ३.३० वाजता आनंद विद्यामंदिर विवली त्यानंतर शाळा लांजा येथे आगमन व मुक्काम.
गुरूवार ११ जुलै रोजी दिवसभरात जि. प. शाळा वाकेड नं. १, नवलादेवी विद्यामंदिर माजळ, जि. प. शाळा देवधे नं. १, जि. प. शाळा आगवे, जि. प. शाळा कोलधे नं. १, सायं. ७ वाजता अक्काताई तेंडुलकर महिलाश्रम लांजा येथे आगमन व मुक्काम.

 

शुक्रवार १२ जुलै रोजी राजापूर तालुक्यात आगमन सकाळी ९ वा. जि. प. शाळा चुनाकोळवण नं. १, १० वाजता जि. प. शाळा शिवणे बु, ११ वाजता जि. प. पेंडखळे शाळा नं. १, व नं. २ शाळा, १२ वा. भू हायस्कुल, २ वा. जि. प. खिणगिणी शाळा, ३ वा. जि. प. तेरवण शाळा, ४ वाजता कशेळी नं. ४ शाळा, ५ वा. जि. प. धाऊलवल्ली नं. १ शाळा, सायं. ७ वा. वात्सल्य विद्यामंदिर ओणी येथे आगमन व मुक्काम.
शनिवार १३ जुलै रोजी सकाळी ८ वा. जि. प. शाळा शिळ नं. १, सकाळी ९ वा. जि. प. शाळा कणेरी, १० वा. जानशी हायस्कुल, ११ वा. जि. प. शाळा हसोळ नं. १, १२.३० वा. जि. प. शाळा केळवली नं. ३, दुपारी १.३० वा. जवळेथर हायस्कुल, ३ वा. जि. प. शाळा पाचल बौध्दवाडी व ४ वा. जि. प. शाळा ओणी नं. ३ येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम होवू दौऱ्याची सांगता होणार आहे.
तरी यावेळी लाभार्थी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी उपस्थीत रहावे असे आवाहन मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार, सौ. शिला चाचड, प्रशांत साळुंखे, शंकर सुर्वे, राजाराम मिरगुळे यांनी केले आहे.