लांजा शाळा नं .५ मध्ये वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न 

 

साने गुरुजी विचारमंच लांजा यांचे आयोजन 

लांजा ( प्रतिनिधी) साने गुरुजी विचारमंच लांजाच्या वतीने शहरातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं .५ मध्ये वृक्षलागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.

आम्ही सर्व निसर्गाचे उपासक आहोत. हा वारसा जोपासण्यासाठी साने गुरुजी विचारमंच लांजा यांचे वतीने जागतीक पर्यावरण दिनानिमित्त लांजा नं .5 शाळेत वृक्षलागवड करण्यात आली . या कार्यक्रमासाठी लांजा तहसिलदार प्रमोद कदम,

पोलीस निरिक्षक दादासाहेब घुटूकडे, नायब तहसिलदार श्री गोसावी, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर , ॲड . सावंत, शाळेच्या

मुख्याध्यापिका विमल चव्हाण तसेच सानेगुरुजी विचारमंचाचे पदाधिकारी उपस्थित होते .

सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांचे

सानेगुरुजी विचारमंच लांजा चे पदाधिकारी यांचे वतीने पणती जपून ठेवा पुस्तक व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .त्यानंतर सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून साने गुरुजी विचारमंच लांजा आयोजीत या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यानंतर

मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .