बुरंबाड येथे वृक्षारोपण

माखजन |वार्ताहर :   संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे श्री आमनायेश्वर मंदिर व बुरंबाड ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सरपंच सौ नम्रता कवळकर,श्री आमनायेश्वर देवस्थान चे अध्यक्ष श्री संजय सहस्त्रबुद्धे,शशिकांत घाणेकर,संदीप कवळकर, आदीसह् शेतकरी उपस्थित होते.

यावेळी चिपळूण तालुक्यातील शरदचंद्र पवार उद्यान विद्या महाविद्यालय खरवते दहिवली येथील कृषी कन्या उपस्थित होत्या.यावेळी कृषी कन्यकांनी मार्गदर्शन केले.