- गितेश कांबळी ठरला उत्कृष्ट गायक
बांदा : प्रविण परब
नेतर्डे ग्रामस्थ आयोजित खुल्या भजन स्पर्धेत तांबुळीच्या स्वरधारा भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. मणेरीचा स्वराभिषेक भजन मंडळ द्वितीय तर कलंबिस्तचे श्री स्वामी समर्थ भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले.
नेतर्डे लिंगाचा मळा येथील श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळाच्या वतीने खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, उपसरपंच प्रशांत कामत, तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, अनंत गवस, देविदास गवस, पुंडलीक नाईक, रामदास नाईक, देवेंद्र गवस आदी उपस्थित होते. दोन दिवस स्पर्धा सुरु होती.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वरधारा भजन मंडळ तांबुळी, द्वितीय स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी, तृतीय श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त, उत्तेजनार्थ श्री माऊली भजन मंडळ कोलझर. उत्कृष्ट गायक – गितेश कांबळी (मणेरी), गौळण गायक – कपिल गांवस (अमई गोवा), झांजवादक – नरेश गवस (नेतर्डे), हार्मोनियमवादक – अमोल गांवस (केरी गोवा), तबलावादक – विराज गांवस (केरी), पखवाजवादक – मेहल कांडरकर (तांबुळी), शिस्तबद्घ संघ – चांदेल भजन मंडळ, कोरस – समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव, लक्षवेधी संघ – सातपाटेकर महिला भजन मंडळ, उत्कृष्ट श्रोता – परशुराम वामन गांवस. स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड व गुरुदास गावकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना माजी सभापती प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके वितरीत करण्यात आली. यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, उपसरपंच प्रशांत कामत, तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, रविंद्र गवस, देविदास गवस, अनंत गवस, पुंडलीक नाईक, रामदास नाईक, सखाराम गवस, सत्यनारायण गवस, लक्ष्मण गवस, विजय गवस, कृष्णा गवस, अशोक गवस, पोलीस पाटील निलकंठ गवस, आदित्य गवस, भिसे गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व भजन निवेदन विलास गवस यांनी केले. विवेक गवस यांनी आभार मानले.
Sindhudurg