बहीण माझी लाडकी चा शिवसेने कडून प्रचारासाठी शिबिरे

 

खेड(प्रतिनिधी) .आमदार श्री.योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ,बहीण माझी लाडकी या योजनेचा प्रचार व प्रसार तळागाळपर्यंत करून पात्र लाभार्त्यांना लाभ मिळावा या साठी प्रत्येक गावात सभेचे आयोजन करून योजनेची माहिती देण्यासाठी शिवसेना शाखा कुडोशी सुकीवली मांडवे बिजघर यांच्या वतीने आज शिबिरे पार पडली

ऑफलाईन तसेंच ऑनलाईन अर्ज कसे भरावेत यांचे मार्गदर्शन शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे संघटक महेंद्र भोसले यांनी केले या शिबिरात पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले.यावेळी सुप्रिया पवार’, श्रीकांत शिर्के , राजेंद्र शेलार,मिलिंद काते रुपेश कदम राजेंद्र चाळके,सौरभ कदम तसेच शिवसैनिक व गावातील महिलांचा प्रतिसाद लाभला