खेड(प्रतिनिधी) ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सी.बी.एस.ई.मोरवंडे -बोरज येथील इयत्ता पहिली मधील .ज्योत पियुष छाब्रिया या विद्यार्थ्याने रत्नागिरी येथे झालेल्या तायक्वांदो अकॅडमी राजापूर आयोजित २२ व्या जिल्हास्तरीय जुनियर अँड सब ज्युनिअर गर्ल्स अँड बॉईज तायक्वांदो चॅम्पियनशिप या स्पर्धेत लहान गटात रजत पदक प्राप्त केले .
त्याने मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष मा. श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष श्री. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे,संस्थेचे संस्थापक सरचिटणीस . श्री. प्रकाश गुजराथी, प्रशालांचे चेअरमन . श्री. चंदनशेठ पाटणे, . श्री. प्रफुल्ल महाजन, . श्री. अनिल शिवदे आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी सदर विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.









