देवरुख येथे हिंदुरहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र देवरुख चे उद्घाटन

Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Inaugurates His Dispensary Urban Arogyavardhini Kendra Devrukh at Devrukh

देवरुख : देवरुख  येथे हिंदुरहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र देवरुख तालुका संगमेश्वर चे दिनांक १५.०४.२०२३ रोजी देवरुखच्या प्रथम नागरिक सौ मृणाल शेटे नगराध्यक्ष नगरपंचायत देवरुख यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) एक स्टाफ नर्स व आरोग्य सेवक(पु.) यांचे मार्फत गरोदर माता तपासणी, नियमित लसीकरण, असंसर्गजन्य रोग नियंत्रण आजार इत्यादी सेवा या बाह्यरुग्ण विभागामार्फत दिल्या जाणार आहेत.

या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र देवरुख च्या उद्घाटना वेळी डॉ.संदिप माने वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवरुख व डाॅ. शॅरन सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) हे उपस्थित होते. या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.शॅरन सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.