लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या घवघवीत यशाची आणि निकालाची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवली आहे.
या वर्षी इयत्ता पाचवी मध्ये एकूण ६२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते,त्यापैकी 30 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये हार्दिक महेश कुरूप याने तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तर श्लोक स्वप्नील चव्हाण, मेघ:श्याम आनंद मुळ्ये, दुर्वा गजानन विभुते व अथर्व खंडू माटोरे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४० विद्यार्थी प्राविष्ठ झाले होते त्यापैकी 13 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये अथर्वा दिलीप ही खेगडे लांजा तालुका प्रथम आली आहे. तर नवेली सचिन भिंगार्डे , अभय विजय कुष्टे , अर्शिया जावेद शेख , नुपूर बाळू नागरगोजे व आर्या अमित फणसळकर या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.
प्रशालेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचां सन्मान आज प्रशालेत करण्यात आला. या सत्कार समारंभाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्या आठवले , उपमुख्याध्यापक श्री.पाटोळे ,पर्यवेक्षक श्री आजगावकर, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते











