गोवंशाचे शीर कुणी टाकले याच्या तपासबद्दल प्रशासनाला जाब विचारणार
मारुती मंदिर ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर निघणार मोर्चा
भाजपा नेते निलेश राणेंसह हजारो हिंदू बांधव होणार सहभागी
रत्नागिरी । प्रतिनिधी :
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील रस्त्यावर सापडलेल्या लहान गोवंशाचे शीर तिथे कोणी टाकले, यातले आरोपी कोणहे ४८ तासात शोधून काढा या सकल हिंदू समाजाने प्रशासनाला दिलेला वेळ संपुष्टात आला असल्याने उद्या रविवारी सकाळी ११ वाजता मारुती मंदिर येथून पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढत जाब विचारो आंदोलन करण्याचा पवित्र रत्नागिरीतील हिंदू समाजाने घेतला आहे. या आंदोलनामध्ये भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह हिंदू समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार आहेत.
गुरुवारी रात्री रत्नागिरी शहरा नजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक ४४ समोरील रस्त्यावर एका छोट्या गोवंशाचे शीर दिसून आले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली होती. हे शीर ज्या पद्धतीने तिथे दिसले होते त्यावरून ते विक्रीसाठी नेले जात होते असा आरोप उपस्थित हिंदू समाजाने केला होता. रत्नागिरी आणि जिल्ह्यातील काही भागातून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी केली जाते आणि ती कत्तल खाण्याकडे नेली जातात असा आरोप केला जात आहे. त्यातच यातील काही प्रकरणे प्रशासनाकडून योग्य रित्या तपासली गेली नसल्याचीही भावना जागरीकांमध्ये आहे. असे असताना गुरुवारी हे गोवंशाचे शीर सापडल्याने हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाल्या. या प्रकरणाचा योग्य आणि त्वरित तपास झाला पाहिजे अशी मागणी समाजाकडून करण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकासमोर यासठी दोन दिवस मोठ्या संख्येने जमाव जमला होता. प्रत्येकाच्याच भावना तीव्र होत्या. प्रशासनाबद्दल असंतोष व्यक्त केला जात होता. यावेळी पोलिसांनी या तपासासाठी ४८ तासांची मुदत मागून घेतली होती.
परंतु शनिवारी रात्री ४८ तास उलटून गेले तरीही पोलिसांकडून या प्रकरणात कोणतही प्रगती दिसून आली नसल्याने संतप्त जमावाने प्रशासनाकडून जाब विचारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सकल हिंदू समाज उद्या रविवारी सकळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे एकत्र जमणार आहे. त्यानंतर सर्वजण तिथून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जात जाब विचारू आंदोलन करणार आहेत.
गेले अनेक घटनांमध्ये पोलिसांकडून ठोस तपास केला जात नसल्याची समाजाची भावना झाली आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाला असून या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामध्ये समाजासोबत असलेले भाजप नेते माजी खासदार निलेश राणे हेही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रत्नागिरीत येत असून त्यांनीही समाज बांधवाना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.










