मेष रास
आज पार्टनरशिप कडे लक्ष द्या. मिळून मिसळून काम करा. एका कामाचे रिझल्ट पाहून मगच पुढच्या कामाला हात घाला. प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल. दिवस चांगला जाईल.
वृषभ रास
आज सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. अधिकारपद, मान मरातब, यामध्ये वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. कामाचे फिक्स स्वरूप तयार करा. वडिलांसोबत वादविवाद होऊ शकतात. वादविवाद टाळा.
मिथुन रास
आज आशादायी गोष्टी घडतील. नवीन प्रेरणा मिळेल. एखाद्या अडचणीतून सुटका होईल. पक्षांना दाणे टाका लाभदायक राहील.
कर्क रास
आज नशिबाची साथ मिळेल. तुमच्याकडे आलेल्या ऑफर्स चा विचार करा. घरी पाहुण्यांची वर्णी लागू शकते.
सिंह रास
आज देण्या-घेण्याचे व्यवहार वेळेवर पूर्ण करा. पूर्वी केलेल्या काही कर्माचे फळ आज मिळेल. इतरांना मदत करा. पैशाशी संबंधित कामे मार्गी लावावी लागतील.
कन्या रास
आज जुन्या आठवणी उफाळून येतील. मित्र-मैत्रिणी, माहेर, सासर, असे घालवलेले प्रसंग आणि व्यक्ती आठवतील. काही जणांच्या भेटी गाठी होतील. पूर्व आयुष्यातील प्रेमी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, पुन्हा आयुष्यात येतील. दैवी मदत मिळेल.
तुळ रास
आज इच्छापूर्तीचा दिवस आहे. खूप दिवसांची एखादी इच्छा पूर्ण होईल. छान मनासारखी खरेदी होईल. छोटी पार्टी करू शकता. आनंदी दिवस जाईल.
वृश्चिक रास
आज प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. तुमचे कौतुक होईल. टीम वर्क करा आणि प्रत्येकाचे क्रेडिट योग्य वेळी त्या – त्या व्यक्तीला द्या. कामाच्या ठिकाणी ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.
धनु रास
आज तुमच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर प्रवासात मिळेल. त्यामुळे भेटीगाठी टाळू नका. कामापासून पळू नका. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मानसिक अशांती जाणवेल.
मकर रास
आज नवीन आशा आकांक्षा निर्माण होईल. मनात प्रेमाचा उदय होईल. दैवी मदत मिळेल. गुरूंचा आशीर्वाद मिळेल. जीवनात प्रेमाचा प्रवेश होईल.
कुंभ रास
आज जे सत्य समोर आहे त्याकडे डोळे झाक करू नका. विचारांना योग्य दिशा द्या. स्वतःमध्ये थोडे बदल करा. डोळ्यावर पट्टी बांधल्या सारखे वागू नका.
मीन रास
आज कामात गती आणण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा. पैशासंबंधीत कामे होतील. गुंतवणुकीचा विचार करा.
@Ritikaslifetherapies
Riitu – The TAROT – ASTRO Consultant
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++++++++++++












