वावेतर्फे खेडच्या सरपंचपदी सौ. विजया उतेकर यांची बिनविरोध निवड

 

 

 

चिपळूण (प्रतिनिधी):–खेड तालुक्यातील वावे तर्फे खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. विजया विलास उतेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही निवड प्रक्रिया नुकतीच वावेतर्फे खेड ग्रामपंचायतमध्ये झाली. नायब तहसीलदार लक्ष्मीकांत सिनकर यांनी ही घोषणा केली.

 

 

सौ. विजय विलास उत्तेकर सरपंच यांचे सासरे सदाशिव धोंडू उतेकर हेही ग्रामपंचायत वावे तर्फ खेडचे माजी सरपंच होते. समाजाची सेवा करणारे हे कुटुंब. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, क्रीडा, कला, शेती, व्यापारी सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग असं काम करणारे हे कुटुंब.

 

 

 

या निवडीवेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक अरुण खळेकर, उपसरपंच हरिश्चंद्र बळीराम सागवेकर, ग्रामपंचायत सदस्या अंकिता उतेकर, आम्रपाली सपकाळ, माजी सरपंच सुभाष उतेकर. माजी उपसरपंच सुर्यकांत उतेकर, सौ. विजया सूर्यकांत उतेकर, मंगेश विष्णू उतेकर, राजेंद्र उतेकर पोस्ट मास्टर अरुण उतेकर, चंद्रकांत उतेकर, चंद्रकांत उतेकर, विलास जाधव, मनोहर उतेकर, मधू उतेकर, विलास उतेकर

अजित उतेकर, अजित सकपाळ, गोविंद उतेकर, यशवंत उतेकर, सुरेश उतेकर, महादेव उतेकर, समीर उतेकर, किशोर उतेकर, सूर्यकांत उतेकर, राजेंद्र उतेकर, कुंदा उतेकर, प्रणिता उतेकर, अर्चना उतेकर, सुवर्णा उतेकर, पूनम उतेकर, भाग्यश्री उतेकर, पोलीस पाटील सुरज उतेकर, कोतवाल आशिष उतेकर

आदी उपस्थित होते.

 

 

*आईला मुलांकडून ७ तोळे सोनसाखळी**

 

आई सरपंच होताच मुलगा स्वप्निल व समीर या दोघांनी आई ला ७ तोळे (चेंन) सोने भेट म्हणून दिले. याबद्दल मुलांचे देखील कौतुक केले जात आहे