१६ रोजी रत्नागिरीत ‘तिएत्रि’ संगीत सभा

 

माखजन |वार्ताहर : रत्नागिरीतील प्रख्यात गायिका सौ मुग्धा भट सामंत या त्यांचे वडील कै.गजानन भट यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या जयंती दिनी संगीत सभेचे आयोजन करत असतात.कै.गजानन भट हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते तर ते उत्तम माऊथ ऑर्गन वाजवत असत.त्यांना संगीतात विशेष रुची होती.त्यांच्या स्मृतींसाठी ही सभा हो आहे.
१६ जुलै रोजी त्याच्या वडिलांची जयंती असून या दिनी रत्नागिरीत,मुग्धनाद प्रस्तुत ‘तिएत्रि’ ही संगीत सभा रंगावणार आहेत.या संगीत सभेत स्वतः त्या गाणार असून सोबत त्यांच्या शिष्य परिवार गाणार आहे.शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम १६ जुलै रोजी सकाळी ९ ते १ व दुपारी २.३० ते ६.३० असा गुरुकृपा मंगल कार्यालय पऱ्याची आळी रत्नागिरी येथे रंगणार आहे.

 

या सभेत स्वतः मुग्धा भट सामंत व शिष्य सार्था गवाणकर,कल्पजा जोगळेकर,समृद्धी रानडे,सानिका लिंगायत,सानिका गोखले, सौ प्राजक्ता जोगळेकर,सौ डॉ.मेधा गोंधळेकर,सौ समृद्धी रसाळ आदिंसह अनेक छोटे गायक यात आपली कला सादर् करणार आहेत.
ही संगीत सभा २०१६ पासून अखंड सुरु आहे.या संगीत सभेला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रख्यात गायिका सौ मुग्धा भट सामंत यांनी केले आहे.