अतिवृष्टी व अंधारामुळे शोधकार्यात अडथळा
दापोली | प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील सातांबा गावातील चार मुले दापोली येथे गेलेली होती आणि घरी न येता ते परस्पर खेम येथील धरणावर गेले होते तेथे आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला आहे. इतर मुले सुखरूप आहेत.
पोलिस यंत्रणा उपस्थित असून अंधार असल्यामुळे व पाणी खोल असल्यामुळे शोधकार्य सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली आहे.












