सकल हिंदू आंदोलनाची क्षणचित्रे : रुग्णवाहिकेला तत्काळ मिळाली वाट

रत्नागिरी | प्रतिनिधी :

सकल हिंदू समाजाने गोवंश हत्येप्रकरणी पुकारलेल्या मोर्चाचे रूपांतर जेलरोड नाका येथे मुख्य रस्त्यावरील रास्ता रोको यांच्यात झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी होती. दोन्ही बाजूला अनेक बसेस, कार, दुचाकीसह मोठ्या प्रमाणात वाहतूक अडवली गेली होती. याचवेळी एक रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. मात्र सामाजिक बांधिलकी जपत सकल हिंदू समाजाने या रुग्णवाहिकेला तत्काळ वाट मोकळी करून देत आपले सामाजिक भान जपले.

मुसळधार पाऊस… तरीही निलेश राणे यांनी सर्वांसह मुख्य रस्त्यावर ठाण मांडले

पोलिसांकडून आरोपीला अटक करून तत्काळ न्यायालयात हजर करण्याच्या सकल हिंदू समाजाच्या मागणीला प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत होता. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला. यावेळी सर्वांसोबत निलेश राणे यांनीही तिथेच ठाण मांडली. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र एक तसूभरही तिथून न हलता अन्य समाज बांधवांसोबत त्या पावसातही निलेश राणे तिथेच ठाण मांडून बसले.

सकल हिंदू समाजाच्या घोषणांनी रत्नागिरी दणाणली

सकाळी ११.३० वाजता सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. यावेळी सर्वानीच जोरदार घोषणांनी संपूर्ण रत्नागिरी दणाणून सोडली. ‘गोसेवा हि गोपाल सेवा’ , ‘ गो हत्या को बंद करेंगे ये संकल्प है हमारा’, ‘गो माता के सम्मान में, हर हिंदू मैदान में’, ‘गो माता अपनी माता, भारत माता सबकी माता’, ‘नही सहेंगे नही सहेंगे, गो हत्या को नही सहेंगे’, ‘ भारत माता कि जय’, ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी जय शिवाजी’  अशा अनेक घोषणांनी भर पावसात वातावरणात एकच जोश निर्माण केला होता.