ओटवणे(प्रतिनीधी) बांदा दाणोली मार्ग कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने अगोदरच बंद होता मात्र सध्या पाणी ओसरले असताना सपतनाथ नजिक कॅनॉल पुलानाजिक डोंगराचा बराच भाग रस्त्यावर कोसळल्याने रस्ता पूर्णतः बंद असून झाला दू चाकी सुद्धा येणे शक्य नसल्याने वाहन चालकानी या मार्गातून न येता सावंतवाडी मार्गे जावे असे आवाहन करण्यात येत आहे.
हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असून या मार्गात असणाऱ्या या धोकादायकच दरडी हटवण्याची गरज असून यावर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ही दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा अशी मागणी होत आहे.











