माखजन |वार्ताहर : रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे व काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवल्यावर,खबरदारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून अर्थात जिल्हाधिकारी यानी जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.निर्णय जाहीर झाल्यावर बोला फुलाला गाठ म्हणतात तस पावसाने ही विश्रांती घेतली.
संगमेश्वर चिपळूण आधी भागात चक्क ऊन पडले आहे.शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याची थोडी आपत्ती व्यवस्थापनाकडून घाई तर केली जात नाही ना?असा सवाल पालक वर्गातून केली जात आहे.कारण गतवर्षी देखील अनेकदा असेच झाले होते.शिवाय ह्या सुट्ट्या सलग रविवार घेऊन भरून काढण्यात येतात यावेळी विद्यार्थ्यांना सलग शाळेत जावे लागते.
सुट्ट्या जाहीर करताना आपत्ती व्यवस्थापनाकडून घाई करू नये अशी पालक व शिक्षण संस्थांकडून मागणी होत आहे









