खेड(प्रतिनिधी)‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची नगरपरिषदेकडून प्रभागनिहाय प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी २० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रभागाची व्याप्ती जाहीर करण्यात आली असून बुथ व वेळही निश्चित करण्यात आली आहे.
प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते व प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. प्रभाग क्र. १ करिता लिपिक संतोष जाधव व डाटा ऑपरेटर मनाली मिरगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रपालनगर येथील शाळा क्र. २ येथील बुथवर दुपारी २.५० ते सायंकाळी ६ यावेळेत माहितीसह रितसर कागदपत्रे जमा करून घेतली जाणार आहेत. प्रभाग २ साठी कनिष्ठ इंजिनिअर प्रणील जाधव, शिपाई अनंत शिबे व अंगणवाडी सेविका दर्शना क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जड्याळवाडी बालवाडी व भुवडवाडी समाज मंदिर येथे दुपारी २.५० ते सायंकाळी ६ यावेळेत नोंदणी केली जाणार आहे. प्रभाग ३ साठी उमेश रेपाळ व डाटा ऑपरेटर सिमरन दरेकर यांची निवड करण्यात आली असून अग्निशमक केंद्र येथे माहिती भरून घेतली जाणार आहे. प्रभाग ४ साठी न.प.चे कर्मचारी सुजित जाधव, शिपाई सुनील खातू व अंगणवाडी सेविका श्रद्धा मेहता यांची नियुक्ती करण्यात आली असून पाण्याच्या टाकीजवळील समाज मंदिर व सम्राट अशोक नगर बालवाडी येथील बुथवर नोंदणी केली जाणार आहे.
प्रभाग ५ करिता लिपीक रूपेश डंबे व कर्मचारी राजेश खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून नगरपरिषद सभागृहात माहिती भरून घेतली जाणार आहे. प्रभाग ६ साठी तन्वी सावंत, रक्षंदा गुजर, सुरज उपावले यांची नियुक्ती करण्यात आली असून हे कर्मचारी देखील नगरपरिषद सभागृहात लाभार्थ्यांची नोंदणी करून घेतील. प्रभाग ७ साठी लिपिक गंगाधर गायकवाड, डाटा ऑपरेटर सिद्धी खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून मुकादम हायस्कूल येथे नोंदणी करतील.
प्रभाग ८ साठी समन्वयक मुक्ताई तीर्थकर, डाटा ऑपरेटर योगिता सागवेकर, दिपिका मुद्राळे यांची नियुक्ती करण्यात आली असून कन्याशाळा येथे माहिती भरून घेतील.










