म्हणूनच लोकसंख्या नियंत्रण अत्यावश्यक
जागतिक लोकसंख्या दिवस: ११ जुलै निमित्त विशेष लेख
भारतासह इतर अनेक देशांमध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे.वाढत चाललेली लोकसंख्या कमी करण्यासाठी सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जात आहेत. भारत हा जगातील सगळ्यात दाट लोकसंख्या असलेला देश आहे. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. याच दिवसाची खास आठवण करून देण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.भारताची लोकसंख्या अब्जावधींच्या घरात आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १.४ अब्ज (१,४४१,९८१,७४४) ९ जुलै पर्यंत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतामध्ये जर अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर २०३० पर्यंत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सगळ्यात दाट लोकवस्ती आहे. दहा बाय दहाच्या छोट्या रूमध्ये सुद्धा अनेक लोक राहतात. लोकसंख्येचा विषय गांभीर्याने घेण्यासाठी जगभरात सगळीकडे लोकसंख्या दिवस साजरा केला जात आहे.
जागतिक लोकसंख्या दिवस- सन-2024 ची थीम:
“ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची”
लोकसंख्या दिनाचा इतिहास आणि महत्व :-
११ जुलै रोजी जगभरात सगळीकडे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. तसेच हा दिवस गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजनाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. याद्वारे लोकसंख्या विस्फोट, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क इत्यादी महत्वाच्या विषयांकडे लक्ष केंद्रित केले जाते.सन १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) द्वारे जागतिक लोकसंख्या दिनाची सुरुवात करण्यात आली.सन १९८७ मध्ये लोकसंख्या जवळपास पाच अब्जांच्या घरात होती, तेव्हा अनेक देशांमध्ये चिंता व्यक्त केली जाऊ लागली. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपायोजना राबवल्या जात होत्या. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
जागतिक लोकसंख्या दिनाचे उद्दिष्ट :
• वाढती लोकसंख्या अनेक समस्यांना निर्माण करते.
• यामुळे संसाधने कमी होतात, पर्यावरण प्रदूषण, आणि जीवन स्तरात घट इत्यादी अनेक गोष्टी होतात.
• लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महिला महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
• जागतिक लोकसंख्या दिनाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे माता वाढत्या जागतिक लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान २०११ च्या आसपास स्पष्ट झाले,जेव्हा जगाची लोकसंख्या सुमारे ७ अब्ज झाली.सन १९८९ मध्ये, UNDP गव्हर्निंग कौन्सिलने लोकसंख्येच्या समस्यांकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी दरवर्षी ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्याची शिफारस केली.
जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा केला जातो :
जागतिक लोकसंख्या दिनब हा प्रजनन आरोग्य सुधारण्यावर आणि संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाते.बाळाच्या जन्मादरम्यान होणाऱ्या गुंतागुंतांमुळे दररोज अंदाजे ८०० महिलांचा मृत्यू होतो.या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी, जागतिक लोकसंख्या दिन मोहिमा,जागतिक जागरुकता आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि कुटुंब नियोजनाची समज वाढवण्यासाठी तसेच लोकसंख्येच्या महत्त्वाच्या समस्यांबद्दल जाणून घेण्यात लोकांना सहभागी करून घेणे हा या विशेष जागरूकता कार्यक्रमाचा उद्देश आहे.यामध्ये लोकसंख्या वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी कुटुंब नियोजन, लिंग समानता, माता आणि बालकांचे आरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्यसेवा, लैंगिक शिक्षण, कंडोम सारख्या गर्भनिरोधकांचा वापर, प्रजनन आरोग्य, किशोरवयीन गर्भधारणा, मुलींचे शिक्षण, बालक यासारख्या विषयांवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे.
विवाह, आणि लैंगिक संक्रमित संक्रमण :
१५ ते १९ वयोगटातील तरुण लोकांमधील लैंगिक आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे, कारण आकडेवारी दर्शवते की या वयोगटातील सुमारे १५ दशलक्ष स्त्रिया दरवर्षी जन्म देतात आणि सुमारे ४ दशलक्ष गर्भपात करतात.
जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यामागील काही मुख्य उद्दिष्टे:
> मुली आणि मुले या दोन्ही लिंगातील तरुणांचे संरक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
> लैंगिकतेबद्दल तपशीलवार ज्ञान देणे आणि ते त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्यास सक्षम होईपर्यंत विवाहाला उशीर करणे.
> वाजवी आणि तरुणांना अनुकूल उपाय वापरून अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी तरुणांना शिक्षित करणे.
> समाजातून लैंगिक रूढी दूर करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे.
> लवकर बाळंतपणाच्या धोक्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी त्यांना गर्भधारणेशी संबंधित आजारांबद्दल शिक्षित करणे.
> विविध संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्यांना STD (लैंगिक संक्रमित रोग) बद्दल शिक्षित करणे.
> मुली आणि मुले दोघांनाही समान प्राथमिक शिक्षण मिळण्याची खात्री करणे.
> प्रत्येक जोडप्यासाठी मूलभूत प्राथमिक आरोग्याचा भाग म्हणून सर्वत्र प्रजनन आरोग्य सेवा सहज उपलब्ध असल्याची खात्री करणे.
आंपण सर्वजण याबद्दल जागरूकता मोहिमा,सार्वजनिक व्याख्याने आणि चर्चा,कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम,आरोग्य शिबिरे आणि सेवा,युवा सहभाग म्हणजेच जनतेचा सहभाग याद्वारे आपण वाढत चाललेली लोकसंख्या स्थिर होणेकामी योगदान देऊ शकतो ..
कुटुंब नियोजनाबाबत आरोग्य विभागाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा:
तात्पुरत्या कुटुंब नियोजन पध्दती मध्ये खालील साधनांचा वापर करता येतो आणि ह्या सर्व सुविधा आरोग्य केंद्रावर मोफत उपलब्ध आहेत.
१)गर्भनिरोधक गोळ्या: यामध्ये माला एन ही गोळी रोज घ्यावी लागते,
किंवा छाया गोळी ही आठवड्यातून एकदा घ्यावी लागते.
२)गर्भनिरोधक इंजेक्शन : दर ३ महिन्याला १ अंतरा इंजेक्शन घ्यावे लागते.
३)तांबी: ५ व १० वर्षासाठी तांबी वापरू शकतात.प्रसूती नंतर हे प्रभावी साधन आहे.दोन जन्मामधील ३ वर्षापेक्षा जास्त अंतर ठेवण्यासाठी वापर होतो तसेच जेव्हा हवे असेल तेव्हा तांबी काढता येते.
४)निरोध :हे गर्भधारणा टाळण्यासाठी तसेच लैंगिक संक्रमित रोग टाळण्यासाठी वापरू शकतो.
कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पध्दती मध्ये खालील शस्त्रक्रिया चा समावेश होतो.यामध्ये शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यास आर्थिक लाभ मिळतो.
१)पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
२)स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया :टाका व बिनटाका शस्त्रक्रिया
“ओळख नव्या विकसित भारताची, कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची” या थीम नुसार तसेच “कुटुंब लहान,सुख महान” या उक्तीप्रमाणे प्रत्येक दाम्पत्यांनी कुटुंब नियोजनावर भर दिला तर आनंदी व आरोग्यमय जीवन जगता येणे शक्य होईल …
डॉ.अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी











