रत्नागिरी : अभ्यास व अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातील सतरा वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या संघाने नुकत्याच डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली
आहे. संपूर्ण स्पर्धेत वेदांत गायकवाड, समर्थ पंडित, स्वयंम पवार, हर्ष कुबडे, ऋग्वेद सावंत आणि गोलरक्षक आर्यन सावंत यांनी आपल्या कामगिरीचा विशेष ठसा उमटवला.
संघाला प्रा. राकेश मालप आणि प्रा. लीना घाडीगावकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा.सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर आणि सर्व संस्था पदाधिकारी यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.











