शिवसेनेचे सुनील दरेकर चौथ्यांदा मैदानात; प्रभाग ३ मधून हॅट्रिकनंतर पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल 

राकेश कोळी| खेड (प्रतिनिधी) – खेड शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेना उमेदवार सुनील बाबुराव दरेकर यांनी यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीकरिता सलग चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी salg तीन कार्यकाळांतील यशस्वी हॅट्रिकनंतर पुन्हा एकदा विजय मिळवण्याचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुनील दरेकर हे खेड नगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅट्रिक करणारे एकमेव उमेदवार म्हणून ओळखले जातात. प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, त्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देणे आणि अडचणीच्या काळात धावून जाणे ही त्यांची कार्यशैली असून त्यामुळे प्रत्येक घराशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. प्रभागातील बहुतांश कुटुंबांशी घरगुती संबंध निर्माण झाल्याने दरेकर यांच्या कामावर नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे.

शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचे सुनील दरेकर हे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून खेेड शहरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून संघटनशीलता, कार्यकर्त्यांशी संवाद, तसेच प्रभागातील विकासकामांवरील त्यांच्या लक्षामुळे दरेकर यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. यापूर्वी त्यांनी खेड नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची dekhil जबाबदारीही सांभाळली असून त्या काळात केलेली विकासकामे आजही लोकांत चर्चिली जातात. राजकीय कार्याबरोबरच ते ट्रान्सपोर्ट व्यवसायात कार्यरत आहेत. या व्यवसायामुळेही त्यांचे शहरातील विविध घटकांशी घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रभागात केलेल्या कामांच्या जोरावर आणि नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर येणाऱ्या नगरपरिषदेत चौथ्यांदा विजय मिळवू, असा विश्वास सुनील दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी उद्योजक शैलेश कदम, शिवसेना उपनेते संजयराव कदम, व्यवसायिक मिनार चिखले, माजी सभापती अण्णा कदम, माजी नगरसेवक रंगा माने यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.