मनसे पदाधिकार्‍यांनी केली खा. नारायण राणे यांच्याकडे महत्वपूर्ण मागणी

 

रत्नागिरी : सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची रत्नागिरीमध्ये मनसे पदाधिकार्‍यांनी बुधवारी भेट घेतली

यावेळी रत्नागिरी -सिंधुदुर्ग या दोनही जिल्ह्यांसाठी संयुक्त असणार्‍या राजापूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रा ऐवजी नागरिकांच्या अधिक सोयीचे व्हावे त्यांचा वेळ व प्रवास खर्च वाचावा यादृष्टीने दोनही जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी या भेटीत मनसेकडून करण्यात आली.

यावेळी शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, मनसे राज्य परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनिल साळवी, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर, शेतकरी सेना शहरअध्यक्ष भारती कुंभार आदी उपस्थित होते.