खेडमधील वाडीजैतापूर येथे होणार नवीन मतदान केंद्र

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील वाडी जैतापूर,वाडी बेलदार व घेरा सुमारगड या दुर्गम भागातील ग्रामस्थांची बरेच वर्षापासून वाडी जैतापूर या मध्यवर्ती  ठिकाणी मतदान केंद्र व्हावे अशी मागणी होती. परंतु या वर्षी आमदार योगेश  कदम यांच्या प्रयत्नातून वाडी जैतापूर या ठिकाणी नवीन मतदान केंद्र मंजूर झाले आहे.
तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तळे मंडळ अधिकारी सौ. लकडे यांनी नवीन मतदान केंद्र मंजूर होणे व मतदार यादीत सुसूत्रित पणा येणे साठी तिन्ही गावातील मतदारांची सभा घेण्यात आली होती.या सभेत या तिन्ही गावातील मतदारांनी एक. मताने ठराव संमत केला
       वाडी जैतापूर येथे नवीन केंद्र झाल्याने मतदारांना ५ ते १० किलोमिटर अंतर कमी होणार आहे,त्यामुळे
 मतदानाची टक्केवारी वाढेल, एकूण ३०० च्या वर मतदार या केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती.सौ.लकडे यांनी दिली
      केलेल्या मागणीची ताबडतोब दखल घेऊन वाडी जैतापूर येथे मतदान केंद्र मंजूर केल्याबद्दल आमदार योगेश कदम व शासनाचे सरपंच सौ.कासार यांनी आभार व्यक्त केले.
      या सभेसाठी मंडळ अधिकारी सौ.लकडे,जैतापूर सरपंच श्री अरुण बांद्रे, मांडवे सरपंच सौ.सुनिता कासार,तलाठी,श्री चौगुले व श्री. चव्हाण,ग्रामसेवक श्री.दीपक कदम व सौ. सिद्धिवाड,बीएलओ श्री. शरद भोसले, पोलिस पाटील श्री.दत्ताराम जाधव व बाळकृष्ण कासार व मतदार उपस्थित होते.