खेड | प्रतिनिधी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात रविवारी भर दिवसा दोन विविध ठिकाणी दरड कोसळण्याचे घटना घडली . यामध्ये मोठमोठे दरड घाटातील रस्त्यावर कोसळल्यामुळे मोठी वाहने काही काळ अडकून पडले होते मात्र जेसीबीच्या साह्याने रविवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर कोसळलेली ही दरड हटवल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
विशेष म्हणजे रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे हजारो पर्यटक या घाटामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आले होते शेकडो वाहने देखील होती याच दरम्यान ही दरड कोसळल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सद्या हा घाट पावसाळा पर्यटना साठी प्रसिद्ध असून घाटात मुंबई पुणे सारख्या ठिकाणाहून पावसाळा पर्यटनाच्या दृष्टीने अनेक जण दाखल होत असतात मात्र सद्या या घाटात दरडी कोसळत असल्याने घाट धोकादायक झाला आहे












