रत्नागिरी ः प्रतिनिधी
सावकारी लायसन्सचे काम करुन देण्यासाठी 50 हजारांच लाच घेणार्या लोकसेवकाला न्यायालयाने 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
विनायक रामचंद्र भोवड (57,रा.त्रिविक्रम नगर कसोप सडा,रत्नागिरी) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. त्याने 26 जून 2024 रोजी सावकारी लायसन्सचे काम करुन देण्यासाठी तक्रारदाराकडे स्वतःसाठी व डीडीआर ऑफीसला देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेची रक्कम सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयात स्विकारताना गुरुवारी त्याला रंगेहाथ लाच लुचपत विभागाकडून पकडण्यात आले होते.











