रत्नागिरी ः प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षामध्ाून 7 हजार रुपयांचा मोबाईल अज्ञाताने लांबवला. ही घटना गुरुवार 11 जुलै रोजी पहाटे 3.30 ते 5 वा. सुमारास घडली आहे.
याबाबत तुषार ईश्वर चंदनशिवे (23, मुळ रा.सोलापूर सध्या रा.थिब पॅलेस,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,ते नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये ड्युटीवर असताना अज्ञाताने तेथील रुमच्या उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करत त्यांचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय सं कायदा 2023 चे कलम 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











