सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ८ जुलै च्या निर्णयानुसार खुल्या व इतर मागास वर्गीय प्रवर्गातील पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्केलाभ देण्यात येणार आहे.सदरील महाराष्ट्र शासनाची सवलत व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल ता. सावंतवाडी या महाविद्यालयात डी.फार्म व बी. फार्म या अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आलेली आहे. या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थिनींना तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सदरील शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे












