ब वर्ग पर्यटनस्थळ असलेल्या माचाळ गावात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड

पंचायत समिती लांजा आणि ग्रामसेवक संघटना शाखा लांजा यांचा संयुक्त उपक्रम

संतोष कोत्रे | लांजा -; तालुक्यातील सर्वात उंचीचे आणि थंड हवेचे ठिकाण असलेले आणि ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या माचाळ या गावी लांजा तालुका पंचायत समिती आणि ग्रामसेवक संघटना शाखा लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २०० झाडांची लागवड करण्यात आली .
माचाळ हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार किलोमीटर उंचीवर आहे. या गावातील वातावरण हे अल्हाददायक आणि नैसर्गिकरित्या उत्तम असल्याने दिवसेंदिवस या पर्यटन स्थळ असलेल्या गावाकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. पावसाळ्यात माचाळचे वातावरण हे अवर्णनीय आणि निसर्गरम्य असते. आणि म्हणूनच या गावाला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.

 

लांजा तालुका पंचायत समिती आणि ग्रामसेवक संघटना शाखा लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने माचाळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा शुक्रवारी वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये जांभूळ,वड, पेरू आणि बहावा आदी जातीच्या सुमारे २०० झाडांची ही लागवड करण्यात आली. यामध्ये माचाळ गावचे ग्रामस्थ देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते .
आधीच सुंदर असलेल्या माचाळ गावाच्या सौंदर्यात भविष्यात या वृक्ष लागवडीमुळे आणखीनच भर पडेल असे मत यावेळी ग्रामस्थांतून व्यक्त केले.

 

या वृक्ष लागवड कार्यक्रमाला प्रसंगी पंचायत समिती लांजा गट विकास अधिकारी संतोष म्हेत्रे, विस्तार अधिकारी संजय लोखंडे, श्री .लोहार, , कृषि विस्तार श्री घाणेकर, कक्ष अधिकारी श्री आंबेकर, श्री .कुरणे पाळू सरपंच सौ नामये, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष चेतन दाभोळकर,, उपाध्यक्ष .प्रबोध कीर सचिव विक्रांत साळवी, पाळू ग्रामसेवक महेश घेवदे,
तसेच सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक तसेच पंचायत समिती कर्मचारी व ग्रामस्थ
उपस्थित होते. माचाळचे गावकर श्री पाटील, मांडवकर उपस्थित होते.