कणकवली : पहाटे पावणे सहा वाजल्या
पासून कणकवली स्थानकावर थांबवून ठेवण्यात आलेली 12134 मेंगलुरु सीएसटीएम एक्सप्रेस मधील एकूण 513 प्रवाशांना 12 एसटी गाड्यांमधून मुंबईकडे रवाना करण्यात आले . कोकण रेल्वे , एसटी विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.
यासाठी कणकवली एसटी डेपोच्या 6 गाड्या ,मालवण डेपोच्या 4 गाड्या, देवगड डेपोची 1 गाडी आणि वेंगुर्ला डेपोची 1 गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात आली. रिकामी रेल्वे गाडी मेंगलोरला परत पाठवण्यात आली . यावेळी स्थानिक साई पॅलेस हॉटेलच्या असलम शेख यांनी प्रवाशांना जेवणाच्या पॅकेट्सची व्यवस्था केली.












