Annual Award of Varaneshwar Engineering College announced
महाविद्यालयात मुलांमधून कु.सत्यम निगम तर मुलींमधून कु.वीणा साळवी प्रथम तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातून महमद नाबील लांडगे सर्वोकृष्ट: रोख रक्कम रक्कम दहा हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित
गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील गुणवंत विद्यार्थांना विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थांना प्रोत्साहनपर देण्यात येणाऱ्या पारितोषिकामध्ये पुढील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी श्री.जयंत कयाळ यांच्या सौजन्याने कै.नारायण श्रीराम कयाळ रोख रक्कम दहा हजार पारितोषिकामध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागाचा कु. महमद नाबील लांडगे हा विद्यार्थी पात्र ठरला. तसेच महाविद्यालयातून अंतिम वर्षात प्रथम आलेला इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचा कु.सत्यम गणेश निगम याला डॉ.भालचंद्र दीक्षित आणि कुटुंबीय यांसकडून देण्यात येणारे कै.माधव गणेश दीक्षित रोख रक्कम दहा हजार हे पारितोषिक प्राप्त झाले. तर अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात महाविद्यालयातून विद्यार्थीनी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस श्रीमती अवंतिका गोरे पारितोषिक रोख रक्कम पाच हजार रुपये आणि कै.राधाबाई व दामोदर केशव गोखले पारितोषिक रोख रक्कम पाच हजार या दोन्ही पारितोषिकांवर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची कु.वीणा जयप्रकाश साळवी हिने नाव कोरले.
चौकट:
महाविद्यालयाकडून मिळणारी प्रोत्साहनपर पारितोषिके प्रेरणादायी
सामाजिक बांधिलकीतून शिक्षण क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या विद्या प्रसारक मंडळ, ठाणेचे अत्यंत जवळच्या निकटवर्तींच्या नावाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर पारितोषिके नेहमीच प्रेरणादायी असतात. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासातील गोडी वाढवण्यास मदत व्हावी आणि अभ्यासात सातत्य राखण्यास प्रेरणा मिळावी यासाठी सदर पारितोषिके या मातब्बर व्यक्तींच्या नावाने मिळणे खूपच भाग्यशाली आहे, असे गौरवद्गार पारितोषिक प्राप्त विद्यार्थांनी काढले.