टॅंकर अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Google search engine
Google search engine
खेड लवेल नजीक दुचाकीला अपघात

खेड | प्रतिनिधी : 

मुंबई – गोवा महामार्गावरील लवेल गावा नजीक जवळ मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला झालेल्या अपघातात ३८ वर्षीय दुचाकी स्वाराच्या अंगावरून भरधाव वेगातील टॅंकर गेल्याने त्याचा जागीच करून अंत ओढावल्याची घटना सांयकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली

मनीष मनोहर महाले वय ३८ रा. कांदिवली मुंबई असे त्या जागीच अंत झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे आपल्या ताब्यातील दुचाकीस्वार नंबर एमएच ०५ बी एन १०४५ ही मुंबई ते चिपळूण अशी घेऊन जात असताना लवेल नजीक अचानक बैल आडवा आला त्याला वाचविण्याच्या नादात मनीष याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर घसरत गेली त्याच दरम्यान पाठी मागून भरघाव वेगाने चिपळूणच्या दिशेने जाणारा टॅन्कर चालकाचा (नंबर व चालकाचे नाव समजले नाही) ताब्यातील टॅन्कर वरील वेगावर नियंत्रण न राहिल्याने रस्त्यावर आडवा पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून टॅन्कर गेल्याने त्याचा जागीच अंत ओढवला

अपघाताची खबर मिळताच वहातुक पोलीस व लोटे पोलीस दुर क्षेत्राचे पोलीस अपघातस्थळी दाखल झाले मृत दुचाकीस्वाराला रुग्णवाहीकेने कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात आणन्यात आले

या अपघातात व दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅन्कर चालकाला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले