मसूरे | झुंजार पेडणेकर खोटले वायंगवडे ते हेदुळ मार्गावर डिकवल खांद येथे अतिवृष्टी मुळे रस्ता खचला असून मोठी भेग रस्त्याला गेली आहे. सदर मार्गावर एसटी ने आपली वाहतूक बंद केली आहे. गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. साबाजी गावडे , विरेश पवार यांनी सदर ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाय योजना करण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे. तातडीने उपाय योजना न केल्यास पूर्ण वाहतूक बंद पडण्याची शक्यता सरपंच सुभाष लाड यांनी व्यक्त केली आहे.












