भाजपा चिपळूण जनसंपर्क जनतेच्या सर्व समस्यांच्या निवारणाचे केंद्र बनेल

 

माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे प्रतिपादन

चिपळूण (प्रतिनिधी):–भाजपा चिपळूण जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सर्व समस्यांच्या निवारणाचे केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी चिपळूणमध्ये भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

 

चिपळूण शहरातील बुरुमतळी येथील शिर्के संकुल या इमारतीमध्ये भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याचे जनसंपर्क कार्यालय नव्याने सुरू झाले आहे. नुकतेच या कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या शुभहस्ते पार पडले.

 

यानंतर भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष सतीश मोरे यांचा वाढदिवस सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

 

यावेळी या उद्घाटन सोहळ्याला भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस नीलम गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, आशिष खातू, विनोद चाळके, नागेश धाडवे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेखाताई खेराडे, जिल्हा चिटणीस विनोद भुरण, विनोद भॊबस्कर, संतोष मालप, गणेश हळदे, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा शितल रानडे, चिपळूण तालुका सरचिटणीस नीलिमा पाटेकर तसेच असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.